मतिमंदत्व आणि लैंगिकतेच्या निरनिराळ्या पैलूंविषयी आवश्यक आणि संवेदनशील अशा मोकळ्या संवादासाठी एक पैस निर्माण करणारे हे त्रैमासिक आहे. काही बाबतीत मतिमंद मुला-मुलींशी कसं बोलावं, काय बोलावं, कधी बोलावं? असे प्रश्न, प्रसंग निर्माण होत असतात, अशा स्थितीत सकारात्मक दिशा दाखवणारे असे हे ‘हितगुज’ आहे. तथापि यासाठी प्रयत्नशील आहे. सन २०१७ पासून आतापर्यंत या त्रैमासिकाचे ९ अंक प्रकाशित झालेले असून ते अधिकाधिक पालक-शिक्षकांपर्यंत पोचत आहेत.