पुण्यातील पिंपरी – चिंचवड भागातील ३ वस्त्यांमध्ये (काळाखडक, साठेनगर, म्हातोबानगर) मागच्या २ वर्षांपासून 0 ते ६ वयोगटातील मुलांसाठी पाळणाघरं सुरु आहेत. कुपोषण दूर करणे, आरोग्य व शाळापूर्व शिक्षण या मुख्य उद्देशाने ही पाळणाघरं सुरु आहेत. यंदा १४ ते २३ नोंव्हेबर दरम्यान आमच्या या सर्व वस्त्यांमध्ये बालदिन साप्ताह साजरा केला गेला. वस्तीतील महिला व मुलांसाठी ‘हेल्थ चेकअप’ कॅम्पचे आयोजन करण्यात आले. १३० महिलांनी सहभाग नोंदविला. किशोरवयीन व पाळणाघरातील मुलांसाठी मैदानी खेळ व पपेट शो चे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्व मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी स्त्रिया व मुलांचं कौतुक म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या. पाळणाघरात नियमित येणारी मुले आणि जे कुपोषणातून बाहेर पडलेली मुलं आहेत अशांचं व त्यांच्या पालकांचं विशेष कौतुक केलं गेलं.