रिसोर्स मेळावा

स्त्रिया आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये अनेक छोटे मोठे गट काम करत असतात. गाव आणि वस्ती पातळीवरच्या आरोग्याच्या मुद्द्यांना धरून प्रशिक्षण आणि कार्यक्रम घेताना अनेकदा आरोग्याविषयी सोप्या माहितीची गरज असते. दुर्गम, लांबच्या  भागात ही माहिती हातात असतेच असे नाही. अशा सर्व कार्यकर्त्यांपर्यंत आरोग्याविषयी आणि विशेषत: स्त्रियांच्या आरोग्याविषयी माहिती पोचावी म्हणून तथापि 'रिसोर्स मेळावा' आयोजित करते.

मेळाव्यामध्ये आरोग्याची वेगवेगळी संसाधने एकत्र मांडली जातात. सोप्या भाषेतली, लोकांच्या समस्यांचा मागोवा घेणारी हाताळायला सोपी संसाधने इथे कार्यकर्त्यांना वाचायला, वापरायला मिळतात. स्लाईड शो, फिल्मच्या माध्यमातून आरोग्याचे वेगवेगळे पैलू पुढे आणले जातात.

संसाधने कशी वापरायची यासोबतच स्थानिक संदर्भात आरोग्याच्या एखाद्या मुद्द्यावर अभियान कसे उभे करता येईल यावरही चर्चा आणि मार्गदर्शन केले जाते. मेळावा दोन दिवसांचा असतो. याचे नियोजन आणि विषय असे असतात.

विषय १ : स्त्रियांमधली रक्तपांढरी व कुपोषण

 

 

रक्तपांढरी हा विषय घेण्यासाठी काय काय संसाधन उपलब्ध आहेत, ती कशी वापरायची, ती वापरत असताना अधून मधून कोणते उपक्रम गटात घेता येतील याची माहिती देण्यात येते. गावामध्ये रक्तपांढरी विषय स्त्रियांसोबत घेताना कसं सत्र नियोजन करता येईल यावर चर्चा आणि सूचना गावाच्या पातळीवर यासंबंधी काय करता येईल (मागण्या, अभियान, इत्यादी)

 

विषय 2 : जननचक्र, मासिक पाळी, जननक्षमता

स्त्रियांचं शरीर, जननचक्र, मासिक पाळी याविषयी सविस्तर माहिती / उपक्रम. त्यावरील संसाधनांचा वापर करुन हा विषय समजावून सांगितला जाईल. याविषयी उपलब्ध संसाधनांची माहिती देण्यात येते. ती कशी वापरायची याबद्दल सूचना. जननचक्र समजून घेणं का महत्वाचं आहे, एकूण आरोग्याशी त्याचा काय बंध आहे, गर्भनिरोधन, गर्भधारणा इत्यादी संदर्भात जननक्षमता समजून घेणे इत्यादी विषयावर मांडणी, चर्चा व वाचन. गावपातळीवर बायाकांसोबत हा विषय कसा घेता येईल याविषयी सूचना.

 

विषय 2 : स्त्रियांवरील हिंसा : सार्वजानिक आरोग्याचा प्रश्न

 

स्त्रियांवरील हिंसेच प्रमाण, आकडेवारी, आरोग्यावरील परिणाम यावर सादरीकरण. हिंसेमुळे येणारी आजारपणं, वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका याविषयी चर्चा होईल. तथापिने तयार केलेली या विषयावरची संसाधनं कार्यक्रम, अनुभव, इ.

 

 

 

संध्या - स्लाइड शो, फिल्म, पारंपरिक खेळ

विषय ३ : शाळांमधील शिक्षकांसाठी शरीर साक्षरता या विषयावर संवाद सत्र

 

शाळेमध्ये 10 ते 12 वयोगटाच्या मुला - मुलींसोंबत लैंगिक शिक्षण जास्त समावेशक पध्दतीने कसे घेता येईल याबाबत शरीरसाक्षरता या संकल्पनेची आणि कार्यक्रमाची माहिती. हा विषय शाळांमध्ये कसा घेता येईल याविषयी चर्चा, नियोजन

 

 

आपल्या भागात असं मेळावा आयोजित करायचा असेल तर तथापिशी संपर्क साधा. आम्ही वाट पाहत आहोत.