‘माझं गाव माझी शाळा’

 

तथापि ‘माझं गाव माझी शाळा’ हा प्रकल्प वेल्हा तालुक्यातील (जिल्हा पुणे) वाजेघर, खाटपेवाडी, मेरावणे, चिरमोडी, गुंजवणे, मार्गासनी, अडवली, या गावांमध्ये राबवत आहे. शाळेतील मुला-मुलींमध्ये निर्णयक्षमता वाढावी, स्वतःच्या आरोग्य व शरीराबद्दल सकारात्मक दृष्टीकोन विकसित व्हावा, नियमितपणे शाळेत जाता यावे यासाठी जीवन कौशल्य व कम्प्युटर प्रशिक्षण या माध्यामातून संवाद साधण्यात येत आहे.

या वर्षीपासून शाळेपुरतं मर्यादित न राहता त्या त्या गावाशी नातं जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करून गावकऱ्यांशी संवाद साधत आहोत. जागर शिक्षणाचा... जागर समानतेचा... हा एक बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम नुकताच सर्व गावात सादर करण्यात आला. १० वी नंतरही मुलींनी शिकावं, कमी वयात लग्न होवू नयेत यावर या जागराचा मुख्य फोकस होता. या कार्यक्रमाला सर्व गावातील लहान मुलांपासून ते गावक-यापर्यंत सर्वाचा उत्साही प्रतिसाद लाभला.

‘माझं गाव माझी शाळा’ या प्रकल्पाचा एक भाग म्हणून आमच्या सर्व शाळांच्या ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्याची तालुक्याच्या ठिकाणी शैक्षणिक सहल काढण्यात आली. या सहलीमध्ये विद्यार्थ्यानी ग्रामीण आरोग्य केंद्र, बँक, पोलीस स्टेशन या ठिकाणी भेटी दिल्या. या सर्व संस्थाची कार्यपध्दती समजून घ्यावी या उद्देशाने सहलीचे आयोजन केले होते.